Pune News: पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठेत जलपर्णीचं साम्राज्य; वेळीच जलपर्णी न काढल्याने प्रवाहाला अडथळा
Pune
1/7
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी देखील वाहून आलेली आहे.
2/7
पुण्यातील शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील मुठा नदीपात्रात मोठी जलपर्णी साचलेली पाहायला मिळत आहे.
3/7
आता पुढील धोका लक्षात घेत पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून या जलपर्णी हटवण्याच काम सुरू झालं आहे.
4/7
चार जेसीबीच्या साह्याने जलपर्णी बाजूला काढण्याचा काम सुरू झालेले आहे.
5/7
गेल्या काही दिवसात पुण्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू केला आहे .
6/7
जवळपास सगळ्याच नदी पत्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी जमा झाल्याचं चित्र दिसत आहे.
7/7
पण महापालिकेने वेळीच जलपर्णी न काढल्याने आता पाण्याच्या प्रवाहाला देखील अडथळा होताना दिसत आहे
Published at : 12 Jul 2022 02:16 PM (IST)