Pune Bomb News: पुण्यातील मांजरी परिसरात पून्हा एकदा आढळली बाॅम्ब सदृश वस्तु; पोलीसांकडून तपास सुुरु

Pune

1/6
पुण्यात पून्हा एकदा बाॅम्ब सदृश वस्तु आढळून आली आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
2/6
वेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे स्मशान भुमी शेजारी आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बाॅब सदृश वस्तु अभिमान रोहीदास गायकवाड यांच्या निदर्शनास आली.
3/6
त्यानंतर या व्यक्तीने त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला.
4/6
परिसरातील नागरिकांनी थोड्या प्रमाणात गर्दी केली होती.
5/6
सकाळी 10 सुमारास ही घटना घडली त्यामुळे मांजरी परिसात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बाॅब सदृश वस्तु आढळून आल्याने वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं होतं.
6/6
तत्काळ मांजरी खुर्द येथे पोलीस पथक व बाॅम्ब शोध पथक आले. दोन्ही पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
Sponsored Links by Taboola