In Pics : पुण्यात सोळाव्या वसंतोत्सवाला बहारदार सुरुवात
16 व्या ‘वसंतोत्सव’ला आज (दि.20 जानेवारी) म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी बहारदार सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपं. अजॉय चक्रबर्ती यांच्या कन्या आणि पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती यांनी आपल्या सुरेल गायनाने महोत्सवाला आरंभ केला.
यावेळी डॉ वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे विश्वस्त बापू देशपांडे, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर, पू ना गाडगीळ अँड सन्सचे अजित गाडगीळ, सूर्यकांत काकडे संस्कृती प्रतिष्ठानचे विजय काकडे, लोकमान्य मल्टीपर्पज कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सुशील जाधव व भालचंद्र कुंटे, एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या लिबरल आर्ट्स विभागाच्या प्रमुख डॉ प्रीती जोशी आदी उपस्थित होते.
यावर्षीच्या महोत्सवात कै. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे. याबरोबरच अजिंठा वेरूळ लेण्यांतील शिल्पांच्या संकल्पनेवर आधारित रंगमंच व्यवस्था हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
गायिका कौशिकी चक्रबर्ती यांनी राग मधुवंतीने आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी 'श्याम भये घनश्याम नही आहे मोरे द्वारे...' ही विलंबित तीन तालातील रचना प्रस्तूत केली.
पुणेकरांनी मला नेहमीच प्रेम दिले आहे. आज पुन्हा पुणेकर रसिकांसमोर गाण्याची मिळत असलेली संधी माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, असं त्या म्हणाल्या.
गायक राहुल देशपांडे यांच्या गायनानेही पुणेकर मंत्रमुग्ध झाले.