आत्याचा डान्स, पार्थचा जल्लोष, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती; शरद पवारांशेजारी प्रफुल्ल पटेल, युगेंद्र पवारांच्या लग्नातील फोटो
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढलेल्या युगेंद्र पवार यांचा विवाहसोहळा आज मुंबईत थाटामाटात संपन्न झाला.
Continues below advertisement
Yugendra pawar marriage
Continues below advertisement
1/15
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढलेल्या युगेंद्र पवार यांचा विवाहसोहळा आज मुंबईत थाटामाटात संपन्न झाला, सर्वांच्या नजरा या सोहळ्याकडे लागल्या आहेत.
2/15
पवार कुटुंबातील या हाय-प्रोफाईल विवाह सोहळ्याला राज्याच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेतेमंडळींनी हजेरी लावली, विशेषतः पवार कुटुंबातील प्रमुख सदस्य या निमित्ताने एकत्र आले होते. मात्र, अजित पवारांची अनुपस्थिति दिसून आली.
3/15
युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्ती एकाचवेळी उपस्थित होत्या. या सोहळ्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांचा उत्स्फूर्त सहभाग
4/15
आत्याबाई असलेल्या सुप्रिया सुळेंनी या लग्न सोहळ्यात युगेंद्रच्या वरातीपुढे डान्स केला, तर युगेंद्रसोबत बग्गीमध्ये अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हेही जल्लोष करताना दिसून आले.
5/15
या लग्नसोहळ्यासाठी राजकीय, आणि बॉलिवूडमधील दिग्गज मंडळींचा सहभाग असल्याचं पाहायला मिळालं, अभिनेत्री सागरिका घाटगे पाटील लग्नाला उपस्थित होत्या.
Continues below advertisement
6/15
अजित पवार यांचे संपूर्ण कुटुंब या लग्नसोहळ्यास उपस्थित होते. सुपुक्ष जय पवार होणारी पत्नी ऋतुजा पाटील यांच्यासोबत होते. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, भाजपच्या पूनम महाजन याही उपस्थित होत्या.
7/15
शायना एनसी, प्रफुल पटेल, राजवर्धन जयंत पाटील, आशुतोष गोवारीकर, सागरिका घाटगे पाटील, पार्थ पवार, जय पवार-ऋतुजा पाटील, पूनम महाजन, रणजितसिंह मोहिते पाटील, सुनेत्रा पवार, गायक राहुल देशपांडे उपस्थित होते.
8/15
माजी आमदार ऋतुराज पाटील, एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक उपस्थित, जयंत पाटील यांचा मुलगा राजवर्धन पाटील हेही उपस्थित होते.
9/15
युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्यातील लक्षणीय बाब म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याजवळ बसले होते. त्यांनी नव दाम्पत्यास शुभेच्छा देत शरद पवारांसोबत चर्चा केली.
10/15
विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही शरद पवारांच्या शेजारीच बसल्याचं दिसून आलं. एकंदरीत युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या निमित्ताने दिग्गजांची मांदियाळी जमली होती.
11/15
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत बाळा नांदगावकर आणि सरदेसाई हेही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
12/15
मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने दोन भाऊ एकत्र आले असून मनसे महाविकास आघाडीत येणार का, अशी चर्चा होत आहे. त्यामुळे, शरद पवार राज ठाकरे भेटीला महत्त्व आहे.
13/15
युगेंद्र यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं असून अजित पवारांच्या मातोश्री, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार हेही सोहळ्याला उत्साहाने उपस्थित होते.
14/15
सुप्रिया सुळेंच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आत्याच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाही
15/15
दरम्यान, इंदापूरमधील सभा संपल्यानंतर अजित पवारांनी बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या सांगता सभेला हजेरी लावली. त्यामुळे, लग्नाचा मुहूर्त टळला, पण अजित पवार रात्री उशिरा लग्नस्थळी पोहोचतील, असे सांगण्यात येते
Published at : 30 Nov 2025 07:14 PM (IST)