बाळासाहेबांचं नाव उच्चारुन शपथेची सुरुवात, आनंद दिघेंनाही विसरले नाहीत, एकनाथ शिंदेंची शपथ वेगळी का ठरली?
राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचा एक साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास स्वप्नवत असाच म्हणावा लागेल.
आज एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून एक नवी जबाबदारी स्वीकारली आहेत.
भाजपला मिळालेल्या प्रचंड यशामुळे आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाटचाल ही आव्हानात्मक ठरेल.
एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता.
त्यांना कुत्सितपणे रिक्षावाला म्हणून हिणवले होते.
मात्र, त्याच एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा जास्त आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची, हे एकप्रकारे ठाकरेंना दाखवून दिले.