Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar Join BJP: सून तेजस्वींचा भाजपात प्रवेश; सासऱ्यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावला अन्...; एक वाक्य अन् विनोद घोसाळकर ढसाढसा रडले!
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar Join BJP: माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत आज भाजपात प्रवेश केला आहे.
Continues below advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar Join BJP
Continues below advertisement
1/8
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar Join BJP: मुंबईत भाजपनं उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का दिला आहे. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत आज भाजपात प्रवेश केला आहे.
2/8
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात प्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा वेदनेतून दिल्याचं, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
3/8
शिवसेनेनं मला ओळख दिली. आता भाजपाकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती मी पार पाडेन. अनेक गोष्टी आहेत, पण मी सध्या बोलू शकत नाही, असंही तेजस्वी घोसाळकरांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर सांगितलं.
4/8
दरम्यान, सून तेजस्वी घोसाळकरांच्या भाजपाप्रवेशानंतर एबीपी माझाने सासरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी विनोद घोसाळकर भावूक झाले.
5/8
आज माझा मुलगा अभिषेक घोसाळकर असता तर हा प्रश्न आला नसता, अभिषेक आणि सून यात फरक आहे. मुलाचे आपण कधीही कान धरू शकतो, पण सूनबाईचे कान धरू शकत नाही, असं विनोद घोसळकर म्हणाले.
Continues below advertisement
6/8
अभिषेक असता तर आज हा प्रश्नच आला नसता, असं म्हणत विनोद घोसाळकर ढसाढसा रडले. मुलाचं नातं आणि सूनचं नातं यामध्ये खूप फरक आहे, असंही विनोद घोसाळकरांनी सांगितले.
7/8
कोण आहे तेजस्वी घोसाळकर? (Who Is Tejasvee Ghosalkar)-तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत.
8/8
अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांचं वर्चस्व असलेल्या मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली, त्याचवेळी त्यांचा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आज तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश केला.
Published at : 15 Dec 2025 02:34 PM (IST)