Soygaon APMC : सोयगाव बाजार समितीचं चेअरमनपद ठाकरेंच्या सेनेकडे, व्हाईस चेअरमन शिंदेंच्या शिवसेनेचा, अब्दुल सत्तार यांनी करुन दाखवलं
Shivsena : सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी ठाकरेंच्या सेनेचे राजेंद्र राठोड तर शिंदेंच्या शिवसेनेचे रंगनाथ वराडे यांची व्हा. चेअरमन पदावर निवड झाली.
सोयगाव बाजार समितीत दोन्ही शिवसेना सत्तेत
1/5
एकीकडे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे मावळते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत आशावादी असल्याचं माझा कट्टावर म्हटलं. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमन पदी शिवसेना उद्धव ठाकरे गट जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिवसेनेच्या शिंदेचे रंगनाथ रामदास वराडे यांची निवड झाली आहे.
2/5
राजेंद्र राठोड आणि रंगनाथ वराडे यांच्या निवडीनंतर सोयगाव शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय सेना भवन समोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
3/5
सध्या दोन्ही शिवसेनेतलं वैर सर्वश्रुत आहे मात्र तालुक्याच्या या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यात यश मिळवले अशी चर्चा सुरू आहे. विशेष बाब म्हणजे बाजार समितीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर नव्हे तर पॅनेलद्वारे लढवल्या जातात.
4/5
नवनिर्वाचित चेअरमन राजेंद्र राठोड, व्हाईस चेअरमन रंगनाथ वराडे तसेच नवनिर्वाचित संचालक यांच्या उपस्थितीमध्ये सोयगाव शहरात भव्य विजय रॅली काढण्यात आली होती.
5/5
सोयगाव येथे तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र राठोड यांची तर व्हाईस चेअरमन पदी रंगनाथ वराडे यांची निवड झाली. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
Published at : 19 Jul 2025 08:07 PM (IST)