खासदाराचा जरांगेंच्या उपोषणाला अंतरवालीत जाऊन पाठिंबा, शिवसेनेचे बंडू जाधव म्हणाले...
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी त्यांनी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ते अंतरवाली सराटी गावातच उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषास पाठिंबा देण्यासाठी अनेकजण येत आहेत. पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदार संजय बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली.
मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे भेट घेतली. परभणी लोकसभेतील आपल्या विजयानंतर ही आमची पहिलीच भेट, असे म्हणत त्यांचे आभार मानत सत्कारही केला.
मनोज जरांगे यांचे आभार मानत, माझा सत्कार स्वीकारत त्यांना धन्यवाद दिले. त्यांच्याशी पुन्हा एकदा भेटून मनस्वी आनंद झाल्याचे खासदार जाधव यांनी म्हटले.
आजपासून मनोजदादांचे उपोषण सुरू होत आहे. ह्या उपोषणादरम्यान पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे व समाजासोबत असल्याचा विश्वास दिला. यादरम्यान सक्रियपणे समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात सहभागी राहण्याचा शब्दही खासदार जाधव यांनी दिला.
दरम्यान, यापूर्वीही बंडू जाधव यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली होती. निवडणूक निकालापूर्वी काही दिवस अगोदर त्यांनी जरांगेंची भेट घेऊन सत्कार केला होता.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा मला व बीडमधील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झाल्याचंही खासदार बंडू जाधव यांनी म्हटलं होतं. तर, निकालानंतर हे सिद्धही झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, विजयानंतर खासदार बंडू जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती.