शक्तिप्रदर्शन! शेकडो गाड्या अन् हजारो कार्यकर्ते; शरद पवारांचे जोरदार स्वागत, पाहा फोटो
Sharad Pawar: शरद पवारांची आज बीडमध्ये पहिली स्वाभिमान सभा होणार आहे.

Sharad Pawar
1/11
शरद पवारांची (Sharad Pawar) आज बीडमध्ये (Beed) स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली आहे.
2/11
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी जाहीर केल्याप्रमाणे आज बीडमध्ये सभा घेणार आहेत.
3/11
शरद पवार यांचा ताफा आज सकाळीच औरंगाबाद येथून बीडच्या दिशेने निघाला आहे.
4/11
दरम्यान बीडकडे जाताना शरद पवारांचा ताफा ठिकठिकाणी थांबवून त्यांचे सत्कार करण्यात येत आहे.
5/11
यावेळी शरद पवारांच्या ताफ्यात शेकडो गाड्या पाहायला मिळत असून, बीडकडे हा ताफा निघाला आहे.
6/11
अनेक ठिकाणी शरद पवारांच्या ताफ्यावर जेसीबीच्या मदतीने फुलांची उधळण करुन पवारांचे स्वागत करण्यात आले.
7/11
तसेच काही ठिकाणी भला मोठा फुलांचा हार जेसीबीच्या मदतीने लावून पवारांचे जंगी स्वागत करण्यात आले.
8/11
यावेळी ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो कार्यकर्ते शरद पवारांच्या स्वागतासाठी उभे असल्याचे पाहायला मिळाले.
9/11
अनेक ठिकाणी शरद पवारांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळत आहे.
10/11
तर शरद पवार बीडमध्ये दाखल झाले असून, बीड बायपासपासून शरद पवार यांच्या रॅलीला सुरुवात झाली आहे.
11/11
यावेळी शरद पवार यांच्यासह रोहित पवार आणि राजेश टोपे देखील सहभागी असल्याचे पाहायला मिळत आहेत.
Published at : 17 Aug 2023 01:40 PM (IST)