Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांची बहीण भावूक, शरद पवारांपुढे धनंजय मुंडेंचं नावही घेतलं; भेटीत नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं असताना आज शरद पवारांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमस्साजोगमध्ये यावेळी शरद पवारांसोबत निलेश लंके, बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे उपस्थित होते. शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम (Sharad Pawar Meet Santosh Deshmukh Family) कुटुंबियांकडून समजून घेतला.
शरद पवारांनी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सात्वन केलं. यावेळी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय शरद पवारांपुढे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
संतोष देशमुखांची बहीण देखील यावेळी भावूक झाली. माझ्या भावाला न्याय मिळायला हवा, जो कोणी या हत्येमागे सूत्रधार आहे, त्यालाही अशीच शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला काहीच नको, न्याय हवाय, अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांच्या बहिणीने शरद पवारांपुढे दिली.
पोलिसांनी आम्हाला मृतदेह कुठे मिळाला, त्याबाबत खोटं सांगितल्याचंही संतोष देशमुखांच्या बहिणीने सांगितलं.
शरद पावरांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. आम्ही सगळे भयभीत आहोत. उद्या कुणाचा नंबर लागेल, याचा नेम राहिला नाही, असं गावकरी म्हणाले.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली.