फलटणमध्ये 14 तारखेला कार्यक्रम, शरद पवारांची घोषणा, रामराजेंनी निर्णय घेतल्यास साताऱ्यात चार मतदारसंघाचं गणित बदलणार, कारण...
शरद पवार यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलताना म्हटलं की इंदापूरला येण्यापूर्वी फलटणवरुन फोन आला होता, इंदापूरमध्ये जो कार्यक्रम आहे तोच कार्यक्रम तिकडे आहे. त्यामुळं आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण तुतारी हातात घेणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटणला पुढील आठवड्यात मेळावा घेऊन ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. रामराजेंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याची विनंती केली होती. रामराजे नाईक निंबाळकरांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही.
रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना कार्यकर्त्यांच्या भावना सांगणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात मेळावा घेणार आहेत. ते काय निर्णय घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतल्यास सातारा जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसू शकतो. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांचं समीकरण बदलू शकतं.
वाई, कोरेगाव, माण आणि फलटण या चार मतदारसंघांवर रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रभाव आहे. त्यामुळं रामराजे नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यास महायुतीला विधानसभेचा पेपर सातारा जिल्ह्यात अवघड जाऊ शकतो. फलटणला सध्या दीपक चव्हाण आमदार आहेत.