शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

राज्यात गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांच्या घरी लग्नांचा सिझन पाहायला मिळत असून शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय नेते, कुटुंब एकत्र येत आहेत.

Continues below advertisement

Raj Thackeray brothers in Marriage mumbai

Continues below advertisement
1/10
राज्यात गेल्या काही दिवसांत बड्या नेत्यांच्या घरी लग्नांचा सिझन पाहायला मिळत असून शाही विवाह सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय नेते, कुटुंब एकत्र येत आहेत.
2/10
अभिनेता आदेश बांदेकर यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यानंतर आयोजित रिसेप्शन सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती.
3/10
आता, मनसे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ.राहुल बोरुडे यांच्या विवाहाचा स्वागत समारंभ मुंबईतील वेलिंग्टन क्लब येथे पार पडत आहे. या स्वागत समारंभासाठी ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
4/10
दिल्लीमध्ये डॉ.राहुल बोरुडे यांचे लग्न पार पडले होते, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जुन उपस्थित होते. विशेष म्हणजे तेव्हा मोदींनी राज ठाकरेंच्या नातवाला जवळ घेत गालगुच्चे घेतले होते.
5/10
मुंबईती आज या लग्नसोहळ्याच्या स्वागत समारंभासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले आहेते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यावेळी मस्त गप्पा मारताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Continues below advertisement
6/10
आदित्य ठाकरे आमि अमित ठाकरे यांच्याही या लग्नसोहळ्यात गप्पा मारताना आणि एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसून आले.
7/10
आदित्य ठाकरे या लग्नसोहळ्यातील स्वागत समारंभात हसत खेळत दिसून आले. काका राज ठाकरेंना जादू की झप्पी तर पुतण्यासोबत खेळताना दिसून आले आहेत.
8/10
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मनसे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतल्याचं दिसून आलं.
9/10
बरुडे कुटुंबीयांमुळे बऱ्याच दिवसानंतर ठाकरे बंधूचे दोन्ह कुटुंब एकाच टेबलावर जेवण करताना पाहायला मिळाले. ठाकरे कुटुंबीयांनी सहकुटुंब स्नेहभोजनाचा आस्वादही घेतला.
10/10
ठाकरे कुटुंबाचा हा कौटुंबिक सोहळा मुंबईतील आणि महाराष्ट्रातील नव्या राजकीय समिकरणाची नांदू ठरू शकतो
Sponsored Links by Taboola