Raj Thackeray-Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना टाळी देताच पहिली ठिणगी पडली?; राज ठाकरेंच्या 'मराठी बाण्याला' भाजपाचं प्रत्युत्तर, घराच्या परिसरात लागले बॅनर्स

Raj Thackeray-Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस अनेकवेळा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले. तसेच एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंनी अनेकवेळा भेट घेतली.

Continues below advertisement

Raj Thackeray-Uddhav Thackeray

Continues below advertisement
1/9
राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागलीये...तसे संकेतही दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिलेत.
2/9
भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतची जवळीक वाढली.
3/9
देवेंद्र फडणवीस अनेकवेळा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले. तसेच एकनाथ शिंदेंनीही राज ठाकरेंनी अनेकवेळा भेट घेतली.
4/9
भाजप आणि मनसेची युती होईल, अशी शक्यताही गेल्या काही दिवसात सुरु होती. मात्र आता मनसे आणि भाजपात ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
5/9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत दिसताच भाजप आणि मनसेमध्ये मिठाचा खडा पडला की काय असंच चित्र सध्या दिसून येतंय.
Continues below advertisement
6/9
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिंदी सक्ती नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अशात, मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीनं हिंदीच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आल्याचं दिसतंय.
7/9
‘ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती’, तोडत नाही तर भाषा जोडते अशी विधानं ह्या बॅनर्सवर दिसत आहेत.
8/9
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर भाजपनं हिंदी भाषेच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे.
9/9
दरम्यान, राज ठाकरेंचे मित्र समजले जाणारे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांनी राज ठाकरेंच्या मैत्रीबाबत एक मोठं विधान केलंय. माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला असं आशिष शेलार म्हणालेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
Sponsored Links by Taboola