Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंचे युतीचे संकेत; उद्धव ठाकरे म्हणाले, चला भांडणं मिटवून टाकली, एक 'अट'ही ठेवली!

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: राज ठाकरेंनी युतीबाबत केलेल्या विधानावर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance

Continues below advertisement
1/8
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance: आमच्यातले (उद्धव ठाकरेंसोबतचे) वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणं, राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलं आहे. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे.
2/8
राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एकप्रकारे राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आहे.
3/8
राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे, उद्धव ठाकरेंनीही सांगितलं.
4/8
आपल्याकडून भांडणं नव्हती ती मिटवून टाकली, असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. आपल्यासोबत जाऊन महाराष्ट्राचा फायदा आहे की भाजपसोबत जाऊन ते आधी ठरवा, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
5/8
किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं चालणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement
6/8
महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हतीच, ती मी मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
7/8
राज ठाकरे काय म्हणाले होते?- मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखती घेतली. या मुलाखतीमध्ये शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहाणं, यात काही मला कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
8/8
मला असं वाटतं, लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असं विधानही राज ठाकरेंनी केलं आहे.
Sponsored Links by Taboola