Raj Thackeray: विधानसभेला दंड थोपटले; पण राज ठाकरे समोर येताच 70 वर्षीय सदा सरवणकरांनी पाय धरले

Raj Thackeray: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील नूतनीकरण केलेल्या जिमखान्याचे उद्घाटन आज मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याहस्ते करण्यात आले. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही आवर्जुन उपस्थित होते.

Continues below advertisement

Sada sarvankar bow in fron of raj Thackeray

Continues below advertisement
1/9
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील नूतनीकरण केलेल्या जिमखान्याचे उद्घाटन आज मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याहस्ते करण्यात आले. मनसेप्रमुख राज ठाकरे हेही आवर्जुन उपस्थित होते.
2/9
राज ठाकरे आणि आशिष शेलार आज दादर जिमखान्याच्या कार्यक्रमात एकत्र दिसणार होते, यानिमीत्तानं जुने मित्र पुन्हा भेटणार अशी चर्चाही सुरु झाली. मात्र, या कार्यक्रमाकडे आशिष शेलारांनी पाठ फिरवली
3/9
यापूर्वी राज ठाकरे आणि आपल्यातली व्यैयक्तिक मैत्री संपल्याचं आशिष शेलारांनी जाहिर केलं होतं. विधानसभा निवडणूकीवेळी तसंच हिंदी सक्तीच्या मुद्गयावरुन आशिष शेलार आणि मनसेत खटके उडाल्याचं दिसून आलं होतं.
4/9
दरम्यान, या जिमखान्याच्या उद्घाटन सोहळ्यात एक वेगळचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेना नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर हेही उपस्थित होते.
5/9
विधानसभा निवडणुकांवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाविरुद्ध ठोस भूमिका घेत, सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली होती.
Continues below advertisement
6/9
माहीम मतदारसंघ महायुतीकडून मनसेला सोडण्याची चर्चा सुरू होती, मात्र सदा सरवणकर आपल्या तिकीटावर अडून बसल्याने अखेर ही जागा शिवसेनेनं लढवली. तेव्हापासून सरवणकर आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधात तणाव होता.
7/9
सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ बंगल्यावरही गेले होते, पण राज ठाकरेंनी त्यांची भेट नाकारली होती. त्यानंतर, आज प्रथमच जिमखाना नुतणीकर कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते.
8/9
सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सदा सरवणकर हे चक्क राज ठाकरेंच्या पाया पडल्याचं पाहायला मिळालं.
9/9
सचिन तेंडुलकर पुढे चालत होते, तेव्हा पाठिमागे असलेल्या राज ठाकरेंजवळ येत 70 वर्षीय सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंचे पाय धरत नमस्कार केला, हा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, राज ठाकरेंचे वय 57 वर्षे आहे.
Sponsored Links by Taboola