माजी आमदार चक्क जिल्हा परिषद कार्यालयात अंथरुन टाकून झोपले; सुरेश लाड यांचं हटके आंदोलन
कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी चक्क रायगड जिल्हा परिषदेत झोपून आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची रायगड जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
Continues below advertisement
SSC and HSC exam date declared
Continues below advertisement
1/7
कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी चक्क रायगड जिल्हा परिषदेत झोपून आंदोलन केले, त्यांच्या या आंदोलनाची रायगड जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
2/7
शिक्षकांच्या होत नसलेल्या बदल्यांमुळे लाड यांचे हे उपोषण सुरू झाले होते, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथेच झोपून राहणार असा पवित्रा त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळाल.
3/7
रायगड जिल्ह्यातील अनेक भागात शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध होत नसल्याने तेथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेत तेथे शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे.
4/7
कर्जत खालापूर चे माजी आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित करत यापूर्वीही मागणी केली होती. मात्,र मागणी पूर्ण होत नसल्याने आज अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला.
5/7
अलिबाग मधील जिल्हा परिषदेत या मागण्यासाठी चक्क झोपून त्यांनी उपोषण सुरू केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, त्यांनी कार्यालयीन परिसरातच अंथरुन टाकून अंग टाकलं होतं.
Continues below advertisement
6/7
जोपर्यंत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबत ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत मी इथून हलणार नाही असा पवित्रा माजी आमदार सुरेश लाड यांनी घेतला होता.
7/7
डोक्याखाली उशी आणि मॅट घेऊन ते कार्यालयीन परिसरात झोपले होते, हाती मोबाईल घेऊन झोपल्याचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
Published at : 13 Oct 2025 08:41 PM (IST)