पुण्यात राजकीय नेत्याच्या जावयाचा प्रताप; मध्यरात्री गाड्यांची तोडफोड, दहशत माजवण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. सातत्याने गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेपही पाहायला मिळत आहे.

Pune kondhava cctv

1/7
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे. सातत्याने गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेपही पाहायला मिळत आहे.
2/7
आता पुन्हा एकदा कोंढवा परिसरातील एका राजकीय नेत्याच्या जावयाचा प्रताप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
3/7
पुण्यात माजी नगरसेवकाच्या जावयाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.
4/7
पुण्यातील कोंढवा परिसरात काल रात्री आरोपींकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. सीसीटीव्हीत हे चित्र स्पष्ट होत आहे.
5/7
गाडी तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नाही.
6/7
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवर गफूर पठाण यांच्या जावयाने ही तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.
7/7
कोंढव्यातील या तोडफोडीत चारचाकी आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून गाड्यांच्या काचाही फुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Sponsored Links by Taboola