Nitish Kumar: नितीशकुमार यांच्यांनतर JDU ची धुरा कोण सांभाळणार? राजकीय वारसदारासंदर्भात मोठं नाव समोर
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे जनता दल संयुक्त पक्षाचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमारांचा राजकीय वारसदार कोण असेल अशा चर्चा सुरु आहेत. माजी आयएएस अधिकारी मनीष कुमार वर्मा जदयू मध्ये प्रवेश करु शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळं त्यांचं नाव चर्चेत आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी आयएएस अधिकारी मनीष कुमार वर्मा जनता दल संयुक्त पक्षात 9 जुलै 2024 रोजी प्रवेश करु शकतात.
मनीष कुमार वर्मा हे बिहारच्या नालंदा येथील रहिवासी आहेत. नितीश कुमार यांच्या कुर्मी समुदायातून ते येतात. मनीष कुमार वर्मा यांचा जन्म 1974 मध्ये झालाय.
मनीष कुमार वर्मा हे नितीश कुमार यांचे नातेवाईक असल्याचं देखील सांगितलं जातं. मनीष कुमार वर्मा 2000 च्या ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी आहेत.
मीडिया रिपोर्ट्स नुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मनीष कुमार वर्मा यांना नालंदा येथून उमेदवारी देण्याच्या विचारात नितीशकुमार होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
मनीष कुमार वर्मा यांनी पूर्णियाच्या जिल्हाधिकारीपदी देखील काम केलं आहे. नितीश कुमार यांच्या सांगण्यावरुन त्यांनी नोकरी सोडली होती.
2014 मध्ये रावण दहन कार्यक्रमात 42 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, नितीशकुमार यांनी त्यांच्यावर कारवाई केली नव्हती. नितीशकुमार यांनी मनीष कुमार वर्मा यांना क्लीन चीट दिली होती. त्यानंतर नितीश कुमार मनीष कुमार वर्मा यांना का वाचवत आहेत असा प्रश्न विचारला गेला होता.