उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढं केलं, भास्कर जाधवांपुढं नाराजीशिवाय पर्याय नाही : नितेश राणे
Nitesh Rane : भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नसल्याचं म्हटलं आहे.
नितेश राणे
1/6
भाजप नेते मंत्री नितेश राणे यांनी ज्या प्रमाणं भाजप सरकार काम करतंय, ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. आता त्या बंद झालेल्या सुकलेल्या, गंजलेल्या उबाठा मध्ये थांबणार कोण असा सवाल केला आहे.
2/6
तिथला सगळा माल संपलेला आहे, मालक संपलेला आहे. आता त्यांच्यात काहीच उरलेलं नाही. बंद, सुकलेल्या दुकानात राहणार कोण त्यामुळं प्रत्येक जण आपापलं भविष्य शोधतंय, असं नितेश राणे म्हणाले.
3/6
भास्कर जाधव सिनिअर असताना पण विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेच नाव उद्धव ठाकरेंनी पुढं केलेलं. म्हणजे भास्कर जाधवांना तिकडे सतरंजाच उचलायच्या आहेत. म्हणून नाराजी शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.
4/6
भास्कर जाधव आठ- नऊवेळा निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेत्याचं नाव पुढं करायचं होतं तेव्हा आदित्य ठाकरेंचं नाव पुढं करण्यात आलं, असं नितेश राणे म्हणाले.
5/6
भास्कर जाधव यांची तिथून इनिंग संपलेली आहे. आजूबाजूच्या सतरंज्या, मोबाईल वैगरे उचलणं एवढंच काम आतां भास्कर जाधव यांना राहिलेलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.
6/6
देशात राहुल गांधी जसं भाजप वाढवत आहेत तसंच आदित्य ठाकरे महाराष्ट्रात राहुल गांधींची भूमिका पार पाडत आहेत, असं नितेश राणे म्हणाले. आदित्य ठाकरे म्हणजे महाराष्ट्र व्हर्जन ऑफ पप्पू असल्याची टीका देखील नितेश राणेंनी केली.
Published at : 22 Feb 2025 08:45 AM (IST)