जुगलबंदी... सुनेत्रा पवार राज्यसभेत पीठासीन सभापती, प्रफुल्ल पटेलांना म्हणाल्या, तुमची वेळ संपली

लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभा खासदार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली.

sunetra pawar rajyasabha sabhapati

1/7
लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभा खासदार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी त्या सध्या राजधानी दिल्लीत असून राज्यसभेच्या तालिका सभापतीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
2/7
राज्यसभेमध्ये आज (10 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून तालिका सभापती म्हणजेच पीठासीन सभापतीपदी सुनेत्रा पवार विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं.
3/7
विशेष म्हणजे पीठासीन सभापती सुनेत्रा पवार असताना केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादीचेच खासदार अजित पवार गटाकडून भाषण करत होते, तर भाजपकडून डॉ. भागवत कराड हे भाषण करत होते.
4/7
खासदार प्रफुल्ल पटेल भाषण करत असताना राज्यसभेत पीठासीन सभापती म्हणून सुनेत्रा पवार आणि राज्यसभा सदस्य म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या जुगलबंदी पाहायला मिळाली.
5/7
सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना तुमचा वेळ संपला आहे, असं सांगून भाषण थांबवण्यास सांगितले. त्यानंतर, विरोधी बाकीवरील खासदारांनी देखील वेळ संपल्याची आठवण करुन दिली.
6/7
सुनेत्रा पवारांच्या या सूचनेनंतर, मला भाजपकडून वेळ मिळाला आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. इकडे वेळ आहे (भाजपकडे हात करून ) यांच्याकडे वेळच वेळ आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
7/7
मात्र, त्यानंतरही सुनेत्रा पवार यांनी तुमचा वेळ संपला आहे, असा पुनर्उल्लेख करता प्रफुल्ल पटेल यांना बसण्यास सांगितले. त्यानंतर, खासदार पटेल यांनी हात जोडून चर्चेला पूर्णविराम दिला.
Sponsored Links by Taboola