शिवरायांचे गड अन् आपली जबाबदारी, खासदार निलेश लंकेंकडून रायरेश्वर गडावर संवर्धन मोहिम

MP Nilesh Lanke : शिवरायांचे गड अन् आपली जबाबदारी, खासदार निलेश लंकेंकडून रायरेश्वर गडावर संवर्धन मोहिम

Continues below advertisement

Nilesh Lanke

Continues below advertisement
1/10
MP Nilesh Lanke : खासदार निलेश लंके यांनी 'शिवरायांचे गड – आपली जबाबदारी' असं म्हणत गड संवर्धन मोहिम सुरु केली आहे.
2/10
निलेश लंके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
3/10
निलेश लंके म्हणाले, रायरेश्वर गडावर आज एक ऐतिहासिक क्षण अनुभवला..
4/10
ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या पवित्र भूमीवर गड संवर्धन व स्वच्छता मोहिमेची सुरुवात "आपला मावळा" संघटनेच्या माध्यमातून केली.
5/10
या संघटनेच्या माध्यमातून हजारो मावळ्यांसह गड संवर्धन व स्वच्छता याबाबत शपथ घेऊन नवी सुरुवात केली.
Continues below advertisement
6/10
शेकडो शिवभक्तांसह पावसाची तमा न बाळगता स्वच्छता, वृक्षारोपण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेचे दिवे, सूचना फलक अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
7/10
"जय शिवाजी, जय भवानी" हे केवळ घोषवाक्य न राहता, कृतीतून शिवरायांच्या विचारांचा प्रसार होणं आवश्यक आहे.
8/10
प्रत्येक गड, प्रत्येक किल्ला, हा आपल्या इतिहासाचा साक्षीदार आहे.
9/10
आपल्या पुढील पिढीला ही ठिकाणं अभिमानाने दाखवता यावीत म्हणून ही मोहिम दर महिन्याला एका गडावर राबवणार आहोत.
10/10
स्वराज्याची शपथ फक्त शब्दांत नव्हे, तर कृतीतही उतरवूया! "गड आपले – जबाबदारीही आपली!"
Sponsored Links by Taboola