आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर मारकडवाडीकडे गेले होते.
गोपीचंद पडळकर अन् सदाभाऊंची वट वाढली, मारकवाडीच्या सभेला स्पेशल हेलिकॉप्टर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून सोलापूरच्या माळशिरज मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव चर्चेचा विषय ठरलं होता
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे माविआला उत्तर दिल.
त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आले होते
मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या एका गटाने ईव्हीएम मशीन वर शंका घेत बॅलेट वरील मतदानासाठी सुरू केलेले आंदोलन आता चांगलाच जोर धरू लागला होता
मारकडवाडी गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना मानणाऱ्या गटाने ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाल्याचा आरोप करीत बॅलेट वर मतदान घेण्याची मागणी केली होती.
3 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने बॅलेट वर मतदानाची तयारी केली असताना प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ही मतदान प्रक्रिया मागे घ्यावी लागली होती
यापूर्वी बॅलेट वर मतदान करण्याचा प्रयत्न केलेल्या गावातील जानकर गटात कडील जवळपास 100 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झालेला आहे.
मात्र आज आता मारकडवाडी गावातील त्या चौकात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सभेचे आयोजन केल्याने पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता होती