PHOTO : ना लवाजमा, ना सुरक्षा; गिरीश महाजन यांचा एकट्याने रेल्वे प्रवास
एखादा मंत्री असो वा एखादा खासदार, आमदार त्यांच्या अवतीभवती लवाजमा पहायला मिळतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र राज्यातील एक मंत्री मात्र याला अपवाद ठरत आहेत.
भाजपचे संकटमोचक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनयांनी सोबत कोणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला.
विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते.
गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे.
प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात.
यामुळे नागरिकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते आणि पोलीस दलावरही भार वाढतो.
गिरीश महाजन यांना 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, त्यांनी अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा नाकारली होती.