Manoj Jarange Patil: ‘इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो’; मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधी भाजपकडून बॅनरबाजी

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Continues below advertisement

Manoj Jarange Patil BJP

Continues below advertisement
1/7
Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काल अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे आता शिवनेरीवर दाखल झालेत. ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र याचदरम्यान मनोज जरांगेंच्या या मोर्चाला भाजपकडून बॅनरबाजीने उत्तर देण्यात येत आहे.
2/7
मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला भाजपचे बॅनरमधून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
3/7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपची बॅनरबाजी दिसत आहे.
4/7
‘इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो’, असं बॅनरवर लिहिलेलं दिसून येत आहे.
5/7
‘मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस’, असंही बॅनवर लिहिलण्यात आले आहे.
Continues below advertisement
6/7
‘उच्च न्यायालयात आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस’, असं म्हणत भाजपकडून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
7/7
भाजप आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि नरेंद्र पाटील यांनी ही बॅनरबाजी केली आहे.
Sponsored Links by Taboola