Maharashtra Politics: देखो भाई, वो ठीक नहीं है...; अमित शाह स्पष्ट बोलले, एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीत काय काय घडलं?

शिवसेना ठाकरे गटाच्या सामनाच्या आजच्या 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेडमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत. छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली. आजही तशाच वतनांसाठी बेईमान दिल्लीत मुजरा झाडतात, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला 'मराठा' जागा झाला. स्वाभिमानासाठी 'उठाव' केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो. शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले. एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले, असं रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 'वेस्टइन' होटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता, असंही संजय राऊत यांनी रोखठोकमधून गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या भेटीत नेमका कोणता संवाद झाला, याबाबतही खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे.
सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत, असं एकनाथ शिंदे अमित शाह यांना म्हणाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची मागणी देखील अमित शाह यांनी फेटाळल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंनी विचारले असता, आमचे 125 लोक निवडणून आले आहेत, मग तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा दावा कसा करु शकतात?, तसेच देखो भाई, वो ठीक नहीं है. अभी नहीं हो सकता, भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असं अमित शाह एकनाथ शिंदेंना म्हणाल्याचं सामनाच्या रोखठोकमधून म्हटलं आहे.
अमित शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता, असंही सामनाच्या रोखठोकमधून म्हटलं आहे.