Laxman Hake Car Attack: आधी गाडी जाळली; नंतर बीडमध्ये सहकाऱ्यावर हल्ला, आता थेट नगरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या कारवर जमावाचा काठ्यांनी हल्ला

Laxman Hake Car Attack: लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे.

Continues below advertisement

Laxman Hake Car Attack

Continues below advertisement
1/10
ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
2/10
ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे.
3/10
आज सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले.
4/10
नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.
5/10
या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही, मात्र त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे, हल्ल्यात काचा फोडण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement
6/10
सुदैवाने हाके यांना शारिरीक इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
7/10
तर याआधी नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कार्पिओ डिझेल टाकून जाळल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे,
8/10
त्यानंतर बीडमध्ये लक्ष्मण हाके (laxman hake) यांचे निकटवर्तीय सहकारी पवन कंवर यांच्यासह त्यांच्या तीन सहकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
9/10
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके (laxman hake) यांचे अतिशय विश्वासू समजले जाणारे पवन कंवर (Pawan Kanwar) व त्यांच्या तीन साथीदारांवर तालुक्यातील सावरगावजवळ जेवण करत असतानाच 40 ते 50 अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला.
10/10
यात पतन कंवर हे गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे साथीदार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर आता हाकेंच्याच गाडीवरती हल्ला करण्यात आला आहे.
Sponsored Links by Taboola