लातूरमध्ये उभारलेला गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा कसा? 900 किलो वजन अन् काय आहेत वैशिष्ट्ये
लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज संपन्न झाले.
Continues below advertisement
Gopinath munde statue latur
Continues below advertisement
1/7
लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आज संपन्न झाले.
2/7
लातुरातील दयानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात पुतळा अनावरणाचा जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्यासह मंत्री, व काही आमदार उपस्थित होते.
3/7
विशेष म्हणजे या पुतळ्याच्या शेजारीच लातूरचे पुत्र आणि महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा देखील पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे, दोन मित्रांचे पुतळे एकाच ठिकाणी उभारण्यात आल्याचं वेगळच समाधान व्यक्त होत आहे.
4/7
गोपीनाथ मुडेंचा हा पूर्णाकृती पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभा करण्यात आला आहे. मुंबईतील नामवंत शिल्पकार विजय बोंदर, यांनी हा पुतळा साकारला आहे.
5/7
या पुतळ्याची उंची 3.65 मीटर असून ब्रांझ धातूपासून पुतळा बनवण्यात आला आहे. पुतळ्याचे वजन 900 किलो आहे.
Continues below advertisement
6/7
गोपीनाथ मुंडेंच्या या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आणि पुतळ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सुशोभीकरणासाठी एक कोटी 51 लाख रुपयाचा खर्च आला आहे.
7/7
दरम्यान, पुतळा अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्याचं पाहायला मिळालं.
Published at : 11 Aug 2025 07:30 PM (IST)