Jayant Patil: पवारांच्या शेजारी बसले, जयंत पाटलांनी भाषण गाजवले; पण संपताच म्हणाले, मला पदापासून मुक्त करा!

Jayant Patil: जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Jayant Patil

1/8
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात आपला 26 वा वर्धापन दिन सोहळा साजरा करत आहेत.
2/8
वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पहिलचं भाषण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. यावेळी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे भर सभागृहात मोठी मागणी केली.
3/8
मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मोठी मागणी जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
4/8
या सोहळ्यात जयंत पाटील शरद पवारांच्या शेजारीच बसले होते. जयंत पाटील यांनी यावेळी चांगलेच भाषण गाजवले. मात्र भाषणाच्या शेवटी मला प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा, अशी मागणी केली. जयंत पाटील यांनी हे विधान करताच सभागृहात जयंत पाटील यांच्या नावाच्या घोषणा सुरु झाल्या. जयंत पाटील तुम आगे बढो, हम तु्म्हारे साथ है, अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.
5/8
मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितले.
6/8
तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
7/8
आम्ही पदाधिकारी यांना निमंत्रण दिलं. कार्यकर्ते नाराज झाले. फोन आले. पावसाळ्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलवून त्यांची अडचण नको म्हणून बोलवलं नाही. प्रशांतने वेळ घेतली म्हणून पुण्यात कार्यक्रम. चांगलं त्याचं कौतुक. त्रुटींची जबाबदारी माझी, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
8/8
आता शिवभोजन थाळी बंद झाली आहे. अनाथांचे पैसे वळवण्याचं काम सरकारकडून होतंय. दोन कोटी रुपये एका पीएकडे सर्किट हाऊसला सापडले. जाहिर फक्त 2 टी झाले. तीन वर्षे प्रशासकाकडून महापालिका चालवल्या जात आहेत. मला शंका आहे जळगावला निवडणूक होणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.
Sponsored Links by Taboola