भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला

जळगावच्या पाळधी गावाच्या बायपासजवळ घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं.

Continues below advertisement

Jalgaon gulabrao patil help accident

Continues below advertisement
1/7
जळगावच्या पाळधी गावाच्या बायपासजवळ घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याचं दिसून आलं.
2/7
राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते तथा स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या रस्त्याच्या बाजुला पडलेल्या युवकाच्या मदतीला धावून आले.
3/7
भाऊबीज दिनी आज गुलाबराव पाटील हे जळगावच्या दिशेने जात असताना बायपासवर रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला तरुण त्यांच्या नजरेस पडला.
4/7
मंत्री महोदयांनी ताबडतोब आपले वाहन थांबवून जखमी तरुणाला मदत केली आणि एका खासगी कारमधून त्याला रुग्णालयात पाठवले.
5/7
आपल्या काही कार्यकर्त्यांना त्या तरुणासोबत पाठवून योग्य उपचार व्हावेत यासाठी डॉक्टरांशी स्वतः दूरध्वनीवर संपर्क साधला.
Continues below advertisement
6/7
गुलाबराव पाटील यांच्यामुळे अपघातग्रस्त तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली. दरम्यान दुचाकीवरील तरुणाचा अपघात कसा झाला?, हे मात्र कळू शकले नाही.
7/7
दरम्यान, पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाची ओळख पटविण्याचं काम सुरू केलं होतं.
Sponsored Links by Taboola