नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावत असून उद्या 2 डिसेंबर रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या पूर्वसंध्येला प्रचाराला अधिक गती मिळाली आहे.
Continues below advertisement
Gautami patil election rally congress
Continues below advertisement
1/8
राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावत असून उद्या 2 डिसेंबर रोजी सर्वत्र मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पडण्याच्या पूर्वसंध्येला प्रचाराला अधिक गती मिळाली आहे.
2/8
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही सेलिब्रिटीही प्रचाराचासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे कोकणातील प्रचारात अभिनेता गोविंदासह बॉलिवूड कलाकारही होते.
3/8
आता, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात नृत्यांगणा गौतमी पाटीलने काँग्रेसच्या महिला उमेदवारांसाठी प्रचारात आघाडी घेतली. नाकात नथणी, गळ्यात गमछा परिधान करत तिने चाहत्यांना आवाहन केलं.
4/8
मूलमधील काँग्रेस उमेदवार एकता समर्थ यांच्यासाठी रोड शो करत गौतमीने सर्वांचे लक्ष वेधले. ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात येणाऱ्या मूल नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे.
5/8
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आता निवडणुकीला अवघे काही तास उरले असता गौतमी येथील शहरात प्रचारासाठी आली होती.
Continues below advertisement
6/8
मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा निवडणुकांमध्ये सेलिब्रिटींचा वापर होतो, त्याचाच भाग म्हणून गौतमी प्रचारात सहभागी झाली. मूलमधील दुर्गा मंदिरपासून सुरू झालेला गौतमीचा रोड शो संपूर्ण मूल शहरात काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसून आला.
7/8
प्रचारादरम्यान, गौतमीसोबत फोटो काढण्यासाठी, तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी, गौतमीनेही चाहत्यांसमवेत फोटो काढले
8/8
गौतमीसमवेत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवारही या रोड शो मधील उघड्या जीपमध्ये दिसून आले
Published at : 01 Dec 2025 06:34 PM (IST)