Devendra Fadnavis and Sambhaji Bhide : छगन भुजबळांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला संभाजी भिडेंचा आशीर्वाद
Devendra Fadnavis and Sambhaji Bhide : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांचा आशीर्वाद घेतलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविशेष म्हणजे माजी मंत्री आणि पुरोगामी विचारांशी नातं सांगणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासमोरचं देवेंद्र फडणवीसांनी भिडेंचा आशीर्वाद घेतलाय. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
साताऱ्यात संभाजी भिडे, देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत.
शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.
त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा अनेक नेते मंडळींमध्येही वाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ आणि संभाजी भिडे यांच्यात देखील मोठा वाद निर्माण झाला होता.
मात्र, आज दोघेही एकाच व्यासपीठावर समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरुन भिडेंच्या भेटीची आणि आशीर्वाद घेतल्याची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, संभाजी भिडे गुरुजी यांची आज सातारा दौऱ्यादरम्यान शिरवळ येथे भेट झाली.
यावेळी केलेल्या स्वागतासाठी आणि दिलेल्या आशीर्वादासाठी भिडे गुरुजी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केलं आहे.