Sharad Pawar: वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच दिल्लीत सेलिब्रेशन; काल स्नेहभोजन, आज शरद पवारांनी केक कापला, निलेश लंकेंना पहिला भरवला, PHOTO
Sharad Pawar: 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून काल दिल्लीत वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Continues below advertisement
Sharad Pawar
Continues below advertisement
1/8
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमत्त राजधानी दिल्लीत काल (10 डिसेंबर) दिग्गज एकवटले होते.
2/8
विशेष म्हणजे अजित पवार (Ajit Pawar), पार्थ पवार (Parth Pawar) आणि प्रफुल्ल पटेलांनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली.
3/8
त्याचसोबत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधींसह (Priyanka Gandhi) अनेक खास पाहुणे पवारांच्या निवासस्थानी आले होते.
4/8
12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून काल दिल्लीत वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, काँग्रेसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली.
5/8
तर शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे खासदार निलेश लंके आणि आदी नेत्यांसोबत शरद पवारांनी वाढदिवसाचा केक कापला.
Continues below advertisement
6/8
यावेळी शरद पवारांनी केक कट करून पहिल्यांदा निलेश लंके यांना भरवला.
7/8
या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो , व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. उद्या १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस आहे.
8/8
मात्र दिल्लीत वाढदिवसाच्या आधीच सेलिब्रेशनला सुरूवात झाल्याचं दिसून आलं.
Published at : 11 Dec 2025 11:41 AM (IST)