उमेदवारी न मिळालेले भाजप आमदार अस्वस्थ; देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर नाराजांची वर्दळ वाढली
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. ही यादी पाहून भाजपच्या काही नेत्यांचा जीव भांड्यात पडला तर यादीत नाव नसलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे पहिल्या यादीत नाव नसलेल्या भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांनी सोमवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सागर बंगला गाठला. त्यामुळे आज सकाळपासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजपमधील नाराजांची ये-जा सुरु आहे.
खडकवासला मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर ते सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले होते.
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधातील भाजपचे इच्छुक बाळा भेगडे हेदेखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे उमेदवारीवरुन जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र आहे.
तसेच वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांचेही भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत नाव नव्हते. खराब कामगिरीमुळे त्यांचा पत्ता कट होणार, असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वर्सोवाच्या आमदार भारती लव्हेकर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.
पहिल्या यादीत सुनिल राणे यांचं नाव नाही त्यामुळे बोरीवली मतदारसंघाचे विद्यामान आमदार सुनिल राणे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.
मुंबादेवीतून अतुल शाह देखील इच्छुक आहे.त्यामुळे मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह देखील सागरवर फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत माघार घ्यायला लागलेले मुरजी पटेल हेदेखील आज सकाळी फडणवीसांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.