भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला.
Continues below advertisement
Satara BJP nagarpalika election results
Continues below advertisement
1/9
सातारा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी तब्बल 42 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत विरोधकांना पराभूत केले.
2/9
या निवडणुकीत अमोल मोहिते यांना ५७,५९६ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवार श्रीमती सुवर्णादेवी पाटील यांना १५,५५६ मते मिळाली आहेत. हा फरक इतका मोठा आहे की, तो विधानसभा निवडणुकीतील एखाद्या आमदाराच्या मतांची बराबरी करेल, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
3/9
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रामशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा अमोल मोहिते, रहिमतपूर येथे वैशाली माने, वाई येथे अनिल सावंत, म्हसवड येथे पूजा विरकर, मलकापूर येथे तेजस सोनवणे, मेढा येथे रूपाली वारागडे यांनी घवघवीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीची सत्ता प्रस्थापित केली आहे.
4/9
जिल्ह्यातील या 7 ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या फरकाने विजयी केले असून, सातारा जिल्ह्यात भाजपच्या विजयाचा झंझावात पाहायला मिळत आहे.
5/9
सातारा नगरपालिकेच्या गेल्या 30 वर्षात दोन वेळा थेट नगराध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या होत्या. त्या निवडणुकांमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीनं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचा पराभव केला होता.
Continues below advertisement
6/9
सातारा विकास आघाडीच्या रंजना रावत एकदा थेट नगराध्यक्ष बनल्या होत्या. तर, 2016 मध्ये झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले मनोमिलन तुटल्यानंतर सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडी आमने सामने आले होते.
7/9
सातारा विकास आघाडी कडून उदयनराजे भोसले यांनी थेट नगराध्यक्ष म्हणून माधवी कदम यांना उमेदवारी दिली होती. तर, नगरविकास आघाडीकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले रिंगणात होत्या. या निवडणुकीत माधवी कदम यांनी वेदांतिकाराजे भोसले यांचा पराभव केला होता.
8/9
साताऱ्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे माजी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांचे नाव भाजपकडून जाहीर झालं होतं. आता, अमोल मोहिते यांनी तब्बल 42 हजार मतांचा लीड घेऊन राज्यातील सर्वात जास्त मतांनी विजयी होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
9/9
उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थकांनी यंदा प्रथमच भाजप म्हणून निवडणूक लढवली. सातारा नगरपालिकेची सदस्यसंख्या 50 असून उदयनराजे भोसलेंच्या गटाला 22, शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाला 22 आणि मूळ भाजपला 6 जागा असा फॉर्म्युला ठरला होता.
Published at : 21 Dec 2025 09:47 PM (IST)