आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाल्या शीतल म्हात्रे
शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात सक्रीय सहभागी होत शिवसेनेसह महायुतीतील दिग्गज नेत्यांसोबत फोटो सेशन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतचाही फोटो त्यांनी शेअर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेतील फुटीनंतर शीतल म्हात्रे यांनी बंडखोर आमदारांबद्दल वादग्रस्त विधान केल होतं. मात्र, काही दिवसांनी त्यांनी शिंदेंच्या शिवसेना गटात प्रवेश केल्यामुळे शीतल म्हात्रे चर्चेत आल्या होत्या
शिवसेनेतील प्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली. यंदाच्या लोकसभा निवडणूक प्रचारातही त्या अग्रभागी दिसून आल्या.
शिंदेंच्या शिवसेनेतील महिला नेत्या म्हणून त्यांनी विविध ठिकाणी प्रचारसभा व रॅलींना हजेरी लावली. बड्या नेत्यांच्या रॅलीतही त्यांचा सहभाग दिसून आला.
महायुती व शिवसेना पक्षाच्या मेळाव्यातही त्यांचा सहभाग होता. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध बैठकीतही त्या दिसून आल्या आहेत.
अभिनेता गोविंदाने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर गोविंदा शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाला. गोविंदासमवेत शीतल म्हात्रे यांनीही पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळल्याचं दिसून आलं.
मुंबईतील प्रचारसभा व रॅलींमध्येही त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मंत्री पियुष गोयल यांच्यासाठीच्या प्रचार रॅलीतूनही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराची खिंड लढवली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळीही त्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेतचा फोटो शेअर केला होता. आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींसवमेतचा फोटो त्यांनी शेअर केला आहे.
भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यासोबत भेट... आयुष्यभर जपून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण. ही संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याबद्दल आभार, असे ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं आहे.