Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ.राहुल बोरुडे यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभ काल (10 नोव्हेंबर) मुंबईतील वेलिंग्टन क्लब येथे झाला.
Continues below advertisement
Aditya Thackeray With Amit Thackeray Son
Continues below advertisement
1/11
Raj Thackeray Uddhav Thackeray Aditya Thackeray Amit Thackeray: मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे मेहुणे डॉ.राहुल बोरुडे यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभ काल (10 नोव्हेंबर) मुंबईतील वेलिंग्टन क्लब येथे झाला.
2/11
दिल्लीमध्ये डॉ.राहुल बोरुडे यांचे लग्न पार पडले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यानंतर काल मुंबईत विवाहाचा स्वागत समारंभ पार पडला.
3/11
डॉ.राहुल बोरुडे यांच्या विवाहाच्या स्वागत समारंभात राज ठाकरेंच्या कुटुंबीयांसह उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित होते.
4/11
आदित्य ठाकरे यावेळी अमित ठाकरेंचा मुलागा किआन ठाकरेसोबत खेळताना दिसले. यावेळी आदित्य ठाकरेंनी किआनसमोर हात पुढे केला.
5/11
मात्र किआनने हात पुढे करताच आदित्य ठाकरेंनी हात लगेच मागे घेतला. आदित्य काका आणि पुतण्या किआनची चांगलीच मस्ती सुरु होती.
Continues below advertisement
6/11
अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यात देखील गप्पा रंगल्या होत्या.
7/11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बोलत असताना किआनची एन्ट्री पाहायला मिळाली.
8/11
उद्धव ठाकरेंनी किआनच्या डोक्यावर यावेळी हात फिरवला.
9/11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या गप्पा सुरु असताना किआन ठाकरे मस्ती करताना दिसला.
10/11
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेही विविध विषयांवर बोलताना दिसले.
11/11
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे आणि किआन ठाकरे यावेळी स्वागत समारंभाला उपस्थितीत होते.
Published at : 11 Dec 2025 12:22 PM (IST)