कोब्रा नव्हे तर विंचवाचं विष सर्वात महाग, किंमत वाचून धक्का बसेल
या विंचवाच्या 1 मिलीलीटर विषाची किंमत सुमारे 8.5 लाख रुपये आहे. डेथस्टॉकर विंचवामध्ये (Deathstalker Scorpion) हे सर्वात महागडं विष आढळतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडेथस्टॉकर विंचवामध्ये (Deathstalker Scorpion) हे विष आढळतं. हे विष जगातील सर्वात महाग विष आहे.
डेथस्टॉकर विंचवाचं विष एवढं महाग असण्याचं कारण म्हणजे, हा विंचू एका वेळी फक्त दोन मिलीलीटर विष देऊ शकतो.
त्यामुळे जर तुम्हाला एक गॅलन विष हवं असेल तर तुम्हाला सुमारे 26 लाख विंचवांचं विष काढावं लागेल.
या विंचवाचं विष इतकं धोकादायक आहे की, जर या विंचवानं तुम्हाला दंश केला तर तुम्हाला असह्य वेदना होतील. त्या सहन करण्यापलिकडे असतात.
डेथस्टॉकर विंचू (Deathstalker Scorpion) संपूर्ण जगात फक्त वाळवंटी भागातच आढळतो. उत्तर आफ्रिकेपासून मध्य पूर्वेपर्यंतच्या वाळवंटात तुम्हाला हा विंचू सहज सापडेल. हा विंचू राजस्थानच्या थारच्या वाळवंटातही आढळतो. या विंचवाच्या 1 मिली विषाची किंमत सुमारे 8.5 लाख रुपये आहे. या विंचवाचे विष काढण्याचे काम राजस्थानातील काही लोक करतात. मात्र, हे काम फार जोखमीचं असल्यामुळे ते या कामासाठी अधिक दर आकारतात.