हिराबा पंचतत्वात विलीन... PMमोदींनी पार्थिवाला दिला खांदा, जड अंतःकरणाने दिला मुखाग्नी, PHOTOS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं.

Continues below advertisement

PM modi

Continues below advertisement
1/11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं.
2/11
PM मोदींनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला
3/11
आईच्या पार्थिवाला मुखाग्नी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे पाणावले होते..
4/11
जड अंतःकरणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईला निरोप दिला.
5/11
गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.
Continues below advertisement
6/11
अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. हिराबेन यांचा 18 जून रोजी 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.
7/11
हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
8/11
आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
9/11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या.
10/11
अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्य तत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल. कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान आज आपली सारी कर्तव्य पार पडताना दिसले.
11/11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं आज पहाटे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झालं. पण या दु:खाच्या प्रसंगातही पंतप्रधानांनी त्यांच्या कर्तव्यभावनेचा विसर पडू दिला नाही. अंत्यसंस्कारासाठी भल्या पहाटेच पंतप्रधान दिल्लीहून अहमदाबादला रवाना झाले. अंत्यविधीचे सारे सोपस्कार पार पाडले आणि तिथूनच ते अहमदाबादच्या राजभवनाकडे रवाना झाले.
Sponsored Links by Taboola