PM Modi Uttarakhand Visit : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर, 4200 कोटींची देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील कुमाऊँ प्रदेशाच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेथे ते 4200 कोटींची भेट देणार असून महादेवाचे दर्शन घेतील.
उत्तराखंडमध्ये जाण्यापूर्वी सर्व माहिती त्यांनी ट्विटरला शेअर केली होती.
ज्यात त्यांनी लिहिले होते, आमचे सरकार देवभूमी उत्तराखंडच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या जलद विकासासाठी वचनबद्ध आहे.
या दौऱ्यादरम्यान, आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या पार्वती कुंड आणि जागेश्वर धामला भेट देणार आहोत.
दुपारी 12 वाजता पंतप्रधान अल्मोडा येथे पोहोचले असून ते जागेश्वर धाम येथे जाऊन त्यांनी पूजा आणि दर्शन घेतले आहे.
सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये सुमारे 224 दगडी मंदिरे आहेत.
पंतप्रधान दुपारी अडीच वाजता पिथौरागढला पोहोचतील जिथे ते ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी यासारख्या क्षेत्रांशी संबंधित सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी पिथौरागढ शहर सज्ज आहे.
विमानतळ ते सार्वजनिक सभेच्या ठिकाणापर्यंतचा सहा किलोमीटर लांबीचा रस्ता राज्यातील विविध प्रांतातील संस्कृती दर्शविणाऱ्या चित्रांनी सजवण्यात आला आहे.