Parbhani Navratri 2022 : परभणीत जेजुरी गडाचा हुबेहूब देखावा; गडाची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची मांदियाळी
Parbhani Navratri 2022 : नवरात्रोत्सवाची सुरुवात जल्लोषात होत असतानाच परभणीतील राजे संभाजी मित्र मंडळाने यावेळी चक्क जेजुरीच्या खंडेरायाचा हुबेहूब गडच उभारला आहे.
Parbhani Navratri 2022
1/8
सगळीकडे नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. भाविक अगदी भक्तिभावाने देवीची पूजा करतायत.
2/8
नवरात्रीचा उत्सव जल्लोषात साजरा होत असतानाच विविध ठिकाणी आकर्षक देखावे, दांडियांचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.
3/8
अशातच परभणीतील राजे संभाजी मित्र मंडळाने यावेळी चक्क जेजुरीच्या खंडेरायाचा हुबेहूब गडच उभारला आहे.
4/8
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात खासदार संजय जाधव यांच्या राजे संभाजी मित्र मंडळाकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन परभणी करांना करून दिले आहे.
5/8
दगडाचा हुबेहूब गड, बाहेरील दीपमाळ उभारण्यात आली आहे.
6/8
तसेच खंडेरायाची मूर्ती ही एकदम सारखीच तयार करण्यात आली आहे.
7/8
देवाचे मुखवट्यांना नागवेलीच्या पानांची सजावट करण्यात आली आहे.
8/8
अतिशय सुंदर आणि हुबेहूब असा हा देखावा पाहण्यासाठी परभणी करांची मोठी गर्दी रोजच इथे होत आहे.
Published at : 02 Oct 2022 06:32 PM (IST)