कोरोनानंतर तीन वर्षांनी परभणीच्या प्रसिद्ध उर्स यात्रेला प्रारंभ
कोरोना मुळे सलग ३ वर्ष रद्द करण्यात आलेल्या परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक्क दर्ग्याच्या उर्स यात्रेला यंदा मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय..
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपजिल्हाधिकारी वडदकर,पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांच्या डोक्यावर ताबूत घेऊन संदलने यात्रेला सुरुवात झाली.
कोरोना मुळे सलग ३ वर्ष रद्द करण्यात आलेल्या परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक्क दर्ग्याच्या उर्स यात्रेला यंदा मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय..
राष्ट्रीय एकात्मेतचे प्रतीक असलेल्या परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्ग्याची उर्स यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग ३ वर्ष रद्द करण्यात आली होती
यंदा आमदार राहुल पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,पोलीस अधीक्षक आर रागसुधा,यांच्या डोक्यावर मानाचा ताबूत देऊन संदल काढण्यात आला
परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्गाह च्या उर्स यात्रेची ११० वर्षाची परंपरा आहे.
१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा भरत असते.
या १५ दिवसात देशभरातील विविध व्यापारी इथे आपली प्रतिष्ठान टाकून करोडोंचा व्यवसाय करतात याशिवाय १५ दिवस इथे विविध सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रम,मुशायरा,गझल,कव्वाली चे मुकाबलेही होतात
तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा परभणीकरांना या यात्रेची पर्वणी मिळणार आहे.