Parbhani News : चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होऊन डबक्यात लोटांगण; परभणीत रस्त्यासाठी गावकऱ्यांचे अनोखे आंदोलन, महिलांना अश्रू अनावर
Parbhani News: अवघ्या दीड किलोमीटरपर्यंतचा रस्ता खराब असल्याने गावकऱ्यांना प्रचंड त्रासाला समोर जावं लागतं आहे. परिणामी, चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होत गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरु केलंय.
Parbhani News
1/6
राज्यभरात पावसाचा जोर वाढतांना दिसतो आहे. अशातच पावसाळ्यात ग्रामीण भागात रस्ते नसल्याने अनेक ठिकाणी गावकऱ्यांना प्रचंड समस्यांना सामोरे जाव लागतंय.
2/6
असाच काहीसा प्रकार परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी गावातून समोर आला आहे. अवघ्या दीड किलोमीटरपर्यंतचा रस्ता खराब असल्याने गावकऱ्यांना प्रचंड त्रासाला समोर जावं लागतं आहे.
3/6
परिणामी, चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होत गावकऱ्यांनी डबक्यात लोटांगण घालून अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरु केलं आहे.
4/6
दरवर्षी पावसाळ्यात रस्ता नसल्याने चिखलातून या गावकऱ्यांना मार्ग काढावा लागत होता. दीड किलोमीटरचा रस्ता अद्याप मिळालेला नसल्याने यावर ना वाहन चालत होते, ना इतर साधने. त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन कराव्या लागत आहेत.
5/6
वारंवार तक्रारी करूनही काही उपयोग होत नसल्याने आज गावकऱ्यांनी थेट चिखलमय रस्त्यात अर्धनग्न होत लोटांगण आंदोलन केले आहे.
6/6
यावेळी महिलांना या रस्त्याबाबतची दुर्दशा सांगताना अक्षरशः अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे तत्काळ हा रस्ता करून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे.
Published at : 17 Aug 2025 10:34 AM (IST)