Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीनिमित्त परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
राज्यभर महाशिवरात्रीचा उत्साह दिसत आहे. महाशिवरात्री निमित्त परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीतील पारदेश्वर हे देशातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. यावर्षी देखील मोठी गर्दी झाली आहे.
परभणीच्या पारदेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
दर्शनासाटी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे.
251 किलोचे पाऱ्याचे शिवलिंग आहे. शिवलिंगावर पंचधातूंचा भव्य नाग, प्रवेशद्वारावर 80 फूट उंच आणि आकर्षक अशी स्वागत कमान या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
सर्वसाधारण वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर पारा हा धातू वितळतो. मात्र याच पाऱ्याचे देशातील सर्वात मोठे म्हणजेच 251 किलो पाऱ्यापासून बनवलेले शिवलिंग मंदिरात आहे.
परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिर हे पाऱ्यापासून बनलेले राज्यातील एकमेव मंदिर असून देशातील सर्वात मोठे मंदिर आहे
महाशिवरात्री निमित्तानं रात्री बारा वाजल्यापासूनच इथे भाविक दर्शनासाठी येत होते आज पहाटेपासून मोठ्या प्रमाणावर भक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे.
आज सकाळी 10 वाजता इथे पारदेश्वराचा अभिषेक पार पडला तसेच दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम इथे पार पडले.
परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पारदेश्वर हे देशातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग मंदिर आहे.