Parbhani Child Marriage : परभणीत एकाच दिवशी 5 बालविवाह रोखले!
चाईल्डलाईन आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने परभणीत गुरुवारी (9 मार्च) एकाच दिवशी पाच बालविवाह रोखले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणीच्या जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंधक अभियान सुरु करण्यात आले आहे.
परभणीच्या सोनपेठ आणि जिंतुर तालुक्यात बाल विवाह लावले जात असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर आली.
त्यावरुन चाईल्ड लाईनचे समन्वयक संदीप बेंडसुरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिकडे यांच्या पथकांनी थेट गावात जाऊन हे बालविवाह रोखले.
ज्यात सोनपेठ तालुक्यात 15,16 आणि 17 वर्षाच्या 3 मुलींचे लग्न हे रोखण्यात आले तर जिंतुर मध्ये 16 आणि 17 वर्ष वयाच्या मुलींचे लग्न रोखण्यात आले.
तसेच पुढील काळजी आणि संरक्षणासाठी या बालविवाहातील मुले आणि मुलींना बालकल्याण समिती पुढे हजर पालकांसह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.