वसईत पुन्हा दरड कोसळली, सुदैवान कोणतेही नुकसान नाही
वसईत आज पुन्हा दरड कोसळली आहे. सातीवलीच्या कोंडापाडा येथील ही घटना आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुदैवाने यात कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाली नाही.
वसई विरार मध्ये मागील दोन दिवसापासून पावसाची बॅटींग सुरु आहे.
वसई पूर्वेच्या सातीवली कोंडापाडा येथील भागात शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
वसई पूर्वेच्या सातीवली भागातील डोंगराला लागूनच कोंडापाडा आहे.
दोन दिवसांपासून वसईत पावसाचा जोर वाढत आहे. शनिवारी सकाळी सतत सुरू असलेल्या पावसामुळे कोंडापाडा येथे आठ ते नऊ मीटर एवढी दरड कोसळली आहे.
याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेत. त्यात दरडीखाली अडकून पडलेला टेम्पो बाजूला केला. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
सध्या स्थितीत दरड कोसळण्याच्या ठिकाणी १६ चाळीतील रूम खाली करून अतिक्रमण विभागामार्फत सिल करण्यात आले आहेत. तर दोन रुम तोडण्यात आले आहेत.
दरड कोसळेला भाग सध्या मोकळा करण्यात आला असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.