Palghar Fort: मराठा साम्राज्याच्या विजयी इतिहासाकडे दुर्लक्ष? केळवे पाणकोट जंजिरा किल्ला मोजतोय शेवटच्या घटका!
पालघरमधील केळवे या प्रसिद्ध पर्यटन स्थळी असलेला केळवे पाणकोट जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या समुद्रांच्या लाटांमुळे हा किल्ला ढासळू लागला असून दुर्ग प्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक किल्ल्याची निर्मिती 450 वर्षांपूर्वी करण्यात आली.
10 जानेवारी 1793 साली मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला जिंकला होता.
त्यानंतर याच किल्ल्याचा आधार घेत पुढे शिरगाव, डहाणू, तारापूर येथील किल्ले आपल्या ताब्यात घेण्यात मराठ्यांना यश आलं.
मात्र हाच केळवे पाणकोट जंजिरा किल्ला सध्या शेवटच्या घटका मोजू लागला आहे.
समुद्राच्या वारंवार बसणाऱ्या लाटांमुळे या किल्ल्याचा काही भाग ढासळू लागला आहे.
या किल्ल्याच्या दुरुस्तीची मागणी किल्ले संवर्धन प्रेमींकडून भारतीय पुरातत्त्व विभाग आणि केळवे ग्रामपंचायतकडे करण्यात आली आहे.
तसंच या किल्ल्याच्या संवर्धनात श्रमदानाची आवश्यकता असल्यास दुर्ग संवर्धन मंडळ तयार असल्याच आश्वासन ही दुर्गप्रेमींकडून देण्यात आले आहे .