पालघरमध्ये एकाच दिवशी चार अपघात, पाच जणांचा मृत्यू
Palghar Accident News : पालघर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी चार अपघात झाले असून या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये.
Accident
1/5
पालघर (Palghar) जिल्ह्यामध्ये शुक्रवार 22 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाले. एकाच दिवसांत चार अपघात (Accident) झाले असून या चार अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय.
2/5
दिवसभरात झालेल्या तीन अपघातानंतर संध्याकाळाच्या सुमारास वाडा मार्गावर कुडूस येथे एका ट्रकने 54 वर्षीय महिलेला चिरडंल. या अपघातामध्ये या महिलेचा जागीच मृत्यू झाला. देवी उपेंद्र शर्मा असं या 54 वर्षीय मृत महिलेच नाव आहे. या अपघातानंतर ट्रच चालक ट्रक घटनास्थळी सोडून फरार झालाय.
3/5
तीन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे पालघर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. वाडा भिवंडी मार्गावर झालेल्या या अपघातामुळे वाहनांना देखील नाहक त्रास सहन करावा लागला.
4/5
वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे संध्याकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्याचप्रमाणे महामार्गावरच वसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय .
5/5
या महामार्गावरच शुक्रवारचा बाजार असल्याने वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कुडूस येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक तसेच ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी वारंवार करण्यात येतेय. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून देखील संताप व्यक्त करण्यात येतोय.
Published at : 22 Dec 2023 09:35 PM (IST)
Tags :
Accident