Christmas 2022 : गोव्याच्या धर्तीवर वसईतही ख्रिसमस कार्निवलची धूम
नाताळ सणानिमित्त गोव्याच्या धर्तीवर निघणारी ख्रिसमस कार्निवल मिरवणूक वसईत ही पाहायला मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवसईच्या या कार्निव्हलमध्ये कोरोना काळात नागरिकांना सेवा देणाऱ्या सफाई कामगार, डॉक्टर आणि पोलीस यांचाही या देखाव्याच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला आहे.
माणिकपूर येथील रसिक रंजन नाट्य मंडळातर्फे यंदा ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. गोव्यासारखी कार्निवल फेस्टिवल वसईत ही पाहायाला मिळते.
यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सर्वधर्म समभाव हा एकात्मतेचा संदेश या कार्निवल मिरवणुकीतून देण्यात आला होता.
महाराष्ट्र आणि वसईच्या संस्कृती परंपरेचं जतन, पर्यावरण आदी सामाजिक प्रश्न सोबत घेऊन हा कार्निवल निघाला होता.
उंट, घोडे आदी ऐश्वर्यपूर्ण दिमाखात तीन राजे आणि त्यांचा लवाजमा या मिरवणुकीत दिसत होता.
आम्ही सर्व एक आहोत असा संदेश देतानाच कोरोनाच्या काळात नागरिकांना सेवा देणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि पोलीस यांचा देखील या देखाव्यात सन्मान करण्यात आला.
वाहतुकीचे नियम पाळा, सफाईवर लक्ष द्या, कोरोनामध्ये डॉक्टरांनी केलेला कामाला सलाम असा संदेश देण्यात आला.
घोड्याच्या रथावर बसून बच्चे कंपनीचा आवडता सांताक्लॉज चॉकलेट वाटत होता. यावेळी स्थानिक रहिवाशांनी कार्निवल बघण्यासाठी एकच गर्दी केली होती.