Pahalgam Terror Attack: जालन्यातील पर्यटकाला दहशतवाद्यांनी विचारले 2 प्रश्न; पहलगाममध्ये हल्ल्याच्या 24 तासांआधी काय घडलं?

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.

Pahalgam Terror Attack

1/6
Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे.
2/6
जालन्यातील आदर्श राऊत नावाच्या युवकाने हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका संशयित व्यक्तीने त्याच्याशी संवाद साधत, "तू काश्मीरी आहेस का?" आणि "हिंदू आहेस का?" असे प्रश्न विचारले होते.
3/6
तसेच आज गर्दी कमी आहे, उद्या पुन्हा येऊया अशी आपापसात चर्चा केल्याचाही दावाही आदर्श राऊतने केला आहे.
4/6
विशेष म्हणजे, हीच व्यक्ती हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळतीजुळती असल्याचा दावा देखील या युवकाने केला आहे.
5/6
आता या संशयावरून आदर्श राऊतने थेट NIA ला ई-मेल करून माहिती देखील दिली आहे.
6/6
राऊत कुटुंब सुट्ट्यामुळे पहलगामला गेले होते. 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते. दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रतील आरोपीचा चेहरा आठवल्याचं आदर्श राऊत यांनी म्हटलं आहे.
Sponsored Links by Taboola