तब्बल 54 तासांची बॅटरी! OnePlus Nord Buds 3R लाँच; संपूर्ण माहिती एका क्लिकवर
आता जास्त वेळ चार्ज करून सुद्धा काही तासांसाठी चालणाऱ्या एअरपॉड्सना मात द्यायला आलाय OnePlus Nord Buds 3R
Continues below advertisement
OnePlus Nord Buds 3R
Continues below advertisement
1/8
ग्लोबल टेक ब्रँड OnePlus ने आपले नवीन ट्रू वायरलेस इअरबड्स OnePlus Nord Buds 3R भारतात लाँच केले आहेत.
2/8
या इअरबड्सची सर्वात मोठी खासियत म्हणजे तब्बल 54 तासांचा प्ले टाइम, जो वनप्लसच्या सर्व TWS इअरबड्समध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.
3/8
TÜV Rheinland बॅटरी हेल्थ सर्टिफिकेशनमुळे यांची बॅटरी दीर्घकाळ टिकते, तर IP55 वॉटर आणि डस्ट रेसिस्टन्समुळे वर्कआउट्स, पावसाळा किंवा प्रवासादरम्यान निर्धास्तपणे वापरता येतात.
4/8
साउंड क्वालिटीसाठी यात 12.4 मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्स, Sound Master EQ, तसेच 3D ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे.
5/8
कॉलिंगसाठी AI नॉइज कॅन्सलेशन फीचर असून, कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.4, 47ms गेम मोड, ड्युअल डिव्हाइस कनेक्शन, आणि Google Fast Pair सारखी सुविधा दिली आहे.
Continues below advertisement
6/8
याशिवाय AI Translation, Tap 2 Take फोटो, आणि Find My Earbuds सारखी स्मार्ट फीचर्ससुद्धा आहेत.
7/8
हे इअरबड्स Aura Blue आणि Ash Black या दोन रंगांमध्ये उपलब्ध होणार असून, त्यांची किंमत ₹1,799 ठेवण्यात आली आहे.
8/8
मात्र लाँच ऑफरमध्ये ग्राहकांना हे फक्त ₹1,599 मध्ये मिळणार आहेत. विक्रीची सुरुवात ८ सप्टेंबर २०२५ पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये होणार आहे.
Published at : 27 Aug 2025 04:19 PM (IST)